There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
नमस्कार, मी अभय सोनक, वय वर्षे ५३, माझ्या जीवनाचे उद्दिष्ट – १ लाख लोकां मध्ये Digital Marketing आणि Personal Branding च्या क्षेत्रात विश्वास निर्माण करून त्यांचे जीवन १००% समृद्ध करायचे आहे.
तुम्ही माझ्या वेबसाईट वर आलात याचा मला आनंद आहे.
तुमचा अमूल्य वेळ तुम्ही मला देत आहात याची मला जाणीव आहे. मला तुमच्या सोबत virtual नाते प्रस्थापित करायचे आहे आणि म्हणूनच मी माझ्या बद्दल थोडेसे सांगणार आहे.
सुरुवात
मी Commerce Graduate असून IT क्षेत्रात Post Graduate Diploma केला आहे. मी वयाच्या ४५ व्या वर्ष पर्यंत, म्हणजेच १० वर्षा पूर्वी पर्यंत, IT infrastructure आणि IT service delivery च्या क्षेत्रात नागपूर, पुणे, मुंबई, चेन्नई व बडोदा या शहरात जॉब मध्ये होतो.. मी मूळचा नागपूरचा असून १३ वर्षे पुण्यात, ५ वर्षे मुंबई आणि १-१ वर्ष चेन्नई व बडोदा या शहरात जॉब आणि व्यवसाया निमित्त वास्तव्यास होतो आणि गेली ४ वर्षे मी नागपूरात आहे.
माझी पत्नी राजेश्री हि सुद्धा business woman असून तिचा home made chocolate making आणि training चा व्यवसाय आहे. आम्हाला १२ वर्षाची मुलगी आहे – मनुश्री, studying in 7th Standard, Podar International School, Besa, Nagpur.
वयाच्या १८ वर्षा पासून ते ४५ वर्षा पर्यंत म्हणजेच २७ वर्षे मी प्रामुख्याने direct sales आणि BPO क्षेत्रातील विविध corporate कंपनीत मी काम (job) केले.
गेली १० वर्षे मी digital marketing च्या क्षेत्रात व्यवसाय करतो आहे आणि त्यातही गेली ३ वर्षे मी digital marketing training क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहे. येथे क्लिक केल्यास माझ्या Netpreneur Digital Marketing Training Institute ची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल.
२००९-२०१० या दोन वर्षांत श्री जयंत हुद्दार (वाशी, नवी मुंबई) यांच्या कडून मी digital marketing चे धडे घेतले. श्री जयंत हुद्दार हे Amazon Best Selling Author, International Seminar Speaker आणि Internet Marketing Specialist आहेत. ब्रायन ट्रेसी, जो विटाले आणि स्टीव्ह हॅकनी सारख्या जगप्रसिद्ध marketing आणि business management गुरूंच्या च्या पुस्तकांत ते co-author आहेत. श्री जयंत हुद्दार यांच्या बद्दल ची सविस्तर माहिती जाणून घ्या साठी येथे क्लिक करू शकता.
श्री. जयंत हुद्दार आणि अमॅझॉन वरची त्यांची बेस्ट सेलिंग पुस्तके
माझे दुसरे mentor श्री. समीर बुलाख, त्यांची-माझी भेट २०११ मध्ये झाली. समीर सर ऑस्ट्रेलिया मधील मेलबर्न येथे राहतात व ते पूर्णवेळ digital strategist आणि blogger आहेत. Online lead generation, branding आणि web development संबंधित उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी त्यांनी बऱ्याच व्यावसायिकांना मदत केली आहे. त्यांचा डिजिगाथा हा हिंदी भाषेतला ब्लॉग प्रचंड लोकप्रिय आहे. श्री समीर बुलाख यांनीं त्यांच्या blog मध्ये केलेली त्यांची introduction खालील प्रमाणे आहे. ?
समीर बुलाख यांनी त्यांच्या डिजीगाथा या डिजिटल मार्केटिंग बद्दलच्या हिंदी ब्लॉग वर केलेली Introduction
श्री. बुलाख यांनी digital marketing च्या क्षेत्रात स्वतःला अक्षरशः वाहून घेतले आहे. त्यांच्या achievements बद्दल मी माझ्या वेबिनार मध्ये सांगतच असतो. २०११ पासून ते आजतागायत त्यांच्या कडून मी digital marketing आणि personal branding प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पद्धतीने शिकतो आहे.
सर्वप्रथम ? नोकरी चे अनेक disadvantages आहेत हे आता मी १० वर्षे business केल्यानंतर (आणि त्या अगोदर २७ वर्षे नोकरी केल्यानंतर) फार जवाबदारी ने सांगू शकतो.
नोकरी म्हणजे काय? – आपण week days मध्ये रोज ऑफिस ला जाणे (किंवा घरी बसून काम करणे) – आपल्याला काही तरी काम assign केलेले असते – ते करणे – मग ते तुम्ही करा किंवा तुमच्या टीम कडून करून घ्या – महिन्याच्या महिना ठराविक पगार उचलणे – वर्षा – दोन वर्षातुन झालेच तर एखादे (तोंडाला पाने पुसणारे) promotion किंवा so called पगारवाढ तेही ५-१०-१५% (त्या पेक्षा inflation rate हा जास्त वेगात वाढतो).
भारतीय job culture मध्ये वरील परिभाषेला corporate क्षेत्राने स्वतः च्या सोयीने वाट्टेल तसे तडे दिले आहेत – फक्त आपला विषय वेगळा असल्या मुळे मी ते इथे नमूद करत नाहीये. मात्र दुसऱ्या एखाद्या ब्लॉग मध्ये मी सगळे सविस्तर लिहणार आहे व इथे त्या ब्लॉग ची लिंक सुद्धा टाकणार आहे.
२०१४ पासून पुण्यातील एक नावाजलेली HR consultancy माझी client आहे. त्यांच्या managing director ला मी हा प्रश्न विचारला – नोकरी करणारे ९०% लोकं असमाधानी आहेत हे खरे का? – ते म्हणालेत चूक. मी थोडा चरकलो कारण मी फारच आत्मविश्वासाने प्रश्न विचारला होता. पण पुढे ते म्हणालेत ९०% नाही तर ९५% टक्के लोकं नोकरीत असमाधानी आहेत.
तुम्ही नोकरीत असा वा business मध्ये – end of the day, you should ask this 1 question to yourself everyday – “Are You Happy With What You Have Done Today?” – जरका उत्तर yes असेल तर तुमचे मना पासून अभिनंदन, तुम्ही खऱ्या अर्थाने आनंदी आयुष्य जगत आहात. पण जर हे उत्तर नकारार्थी असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनात आवश्यक बदल करणे गरजेचे आहे हे नक्की.
थोडक्यात – कुणी तरी सांगितलेले काम आयुष्यभर करत राहण्यासाठी (म्हणजेच नोकरी साठी) आपला जन्म झाला आहे का हा प्रश्न मला सतत भेडसावत होता. त्यातही करत असलेल्या कुठल्याही job मध्ये मी खूप आनंदी होतो असे अजिबात नव्हते – शेवटी मी सुद्धा ९५% crowd मधलाच आहे याची मला जाणीव होत होती आणि एक दिवस मी निर्णय घेतला – मी नोकरी सोडून business करणार.
“मी business करणार” सारखा संकल्प नोकरी करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात “वल्गना” समजल्या जातात – विशेषतः मराठी जनमानसात.
27 वर्षे नोकरी केल्यानंतर वयाच्या ४५ व्या वर्षी मी ते धाडस करत होतो. प्रोत्साहन तर दूर पण आडकाठ्या भरपूर येत होत्या तेही अगदी पावलो-पावली. त्या वेळेला मला प्रत्येका मधली मानसिकता समजू लागली आणि त्या-त्या व्यक्तींची limitations सुद्धा. माझ्या मनात ज्यांचे खूप मोठे स्थान होते ते नेहमीकरता नगण्य झाले.
मात्र त्याच वेळेस काही जण मी घेत असेलेल्या initiative साठी मला प्रोत्साहित सुद्धा करीत होते – फक्त ते हाताच्या बोटावर मोजण्या इतके कमी होते. त्या वेळेस मला जाणवले कि जीवनात आलेल्या आणि येत असलेल्या लोकांना बरोबर ओळखण्याची कला मला अवगत झाली आहे. And You Know What, Life Became All The More Beautiful Then After!
खरे तर मी कुणा कडून कुठलेच प्रोत्साहनअपेक्षित केले नाही आणि करायचे कारण हि नाही. कारण जे काही करायचे ते स्वतः करायचे आणि त्याचे चांगले -वाईट परिणाम face करायचे या वर मी ठाम होतो – आणि तिथून पुढे माझा business मधील माझा प्रवास सुरू झाला.
माझा business माझी passion – पूर्वी E-TV मराठी (आताचे Colors मराठी) वर “संवाद” नावाचा कार्यक्रम होत असे. त्यात रोज सकाळी प्रख्यात व्यक्तींची मुलाखत राजू परुळेकर हे प्रसिद्ध पत्रकार घेत असत. त्यात २००७ जानेवारी मध्ये जयंत हुद्दार सरांची मुलाखत पाहून मी digital marketing या विषयाने प्रभावित झालो.
२००७ जानेवारी मध्ये जयंत हुद्दार यांची टीव्ही वरील मुलाखत पाहून मी DIGITAL MARKETING या विषयाने प्रभावित झालो.
मी information technology चा माणूस असलो तरीही direct sales कंपनीत काम करत असल्या मुळे marketing हा विषय फार जवळून पहिला व अनुभवला होता. Sales मधील मुले भरपूर पगार कामवायची आणि मी व माझे साथीदार मात्र IT मध्ये, म्हणजेच support function मध्ये, म्हणजेच ठराविक पगार हे समीकरण होते. फरक sales executives field वर काम करायचे आणि मी ऑफिस मध्ये बसून काम करायचो.
ऑफिस मध्ये sales च्या बऱ्याच लोकांशी माझ्या चर्चा व्हायच्या, त्यांचे challenges मी समजून घेत असायचो आणि त्यावर त्यांना माझे मत सांगायचो. माझ्या marketing बद्दल च्या ideas आणि concepts ला sales executives दाद द्यायचे. Abhay, You Are Unfit In It, You Should Join Us In Sales हे मला काही मोजके sales executives / managers सांगत असत. विशेष म्हणजे ते सर्व त्यांच्या field मध्ये super performing होते.
Support Function Means a Thankless Job – हम धंदा ले आते है इसीलिये तुम्हारे घर का चुल्हा जलता है – अशा एक ना अनेक डिवचण्या मी sales च्या लोकांकडून वारंवार खाल्ल्या व पचवल्या आहेत. ?
Digital marketing ला भविष्य आहे हि खात्री होतीच. दुसरे, आपल्या मध्ये information technology व्यतिरिक्त marketing चे skills आहेत आणि त्याचा वापर करून आपण marketing मध्ये यावे हे माझ्या मनात होतेच. जयंत सरांच्या मुलाखती मधून लक्षात आले कि digital marketing क्षेत्रात आपल्या दोन्ही skill set चा उपयोंग होऊ शकतो. (अर्थात हे १० -१२ वर्ष पूर्वीचे विचार आहेत, आता २०२० मध्ये digital marketing शिकण्या व समजण्यासाठी information technology चे ज्ञान असणे अजिबात गरजेचे नाही).
२००९ मध्ये मी जयंत सरांचे training घायला सुरवात केली आणि २०१० मार्च मध्ये freelance digital marketer म्हणून business ला सुरवात केली. तेंव्हा पासून ते आतापर्यंत चा प्रत्येक दिवस मी enjoy करतो आहे. कारण एकाच, मी जे काम करतोय ते मी भरपूर enjoy करतो आहे आणि त्यातून मला आनंद मिळत आहे.
Freelance digital marketing च्या business मध्ये माझे ७०+ clients झालेत. तर गेल्या ३ वर्षाच्या काळात माझे ५००+ विद्यार्थी झालेत. या दरम्यान मी अनेक ठिकाणी paid आणि free सेमिनार्स दिलेत. नागपूरच्या प्रतिष्टीत Dr. Babasaheb Ambedkar College आणि City Premier College मध्ये guest lecture ला जात असतो.
Netpreneur Digital Marketing Training Institute च्या अनेक student ला जॉब मिळालेले आहेत आणि ते चांगले काम हि करत आहेत. १००% Job Guarantee In Written (Subject To Completion of 100% Practicals) देणारे आम्ही कदाचित आम्ही एकमेव Institute नागपूर मध्ये आहोत.
Digital marketing चे classes घेत असतांना एक गोष्ट लक्षात आली कि या क्षेत्रा बद्दल लोकांच्या मनात प्रचंड संभ्रम आहे. याचे कारण स्वतःला digital marketer म्हणणारे खूप लोकं आहेत आणि ते training च्या क्षेत्रात सुद्धा उतरले आहेत. या मध्ये बहुतांश trainers व्हिडीओ पाहून किंवा पुस्तक वाचून trainer बनलेले असतात तर काही एखादा छोटासा course करून. त्यांना स्वतःच्या ट्रैनिंग course चे चांगले marketing करणे जमलेले असते आणि लोकं (त्यांचा विद्यार्थी गण) नेमके इथेच बळी पडतात. Course Join केल्या नंतर हातात खूप काही पडत नाही किंवा संभ्रम अजून वाढलेला असतो.
Digital marketers चे विचाराल तर – दोन महिन्यात leads आणून देतो, likes किंवा followers वाढवून देतो, महिन्या भरात SEO करून देतो सांगणारे जास्त आहेत.
खरे तर likes वाढवून leads मिळत नाहीत. Leads आणि SEO बद्दल बोलायचे तर by fluke कधी एखाद्या वेळेस ते झाले हि असेल, पण इथे लागतात long term strategies. ते फार कमी लोकं वापरतात कारण स्वतः त्यांनाच या बद्दल ची माहिती नसते. आम्ही आमच्या customers चे expectations व्यवस्थित set करतो. कुठलेही over commitment करत नाही जेणे करून customer चा अपेक्षा भंग होत नाही. या मध्ये एखादा customer आमच्या competition च्या influence मध्ये येऊन खूप अपेक्षा करत असतो, आम्ही तसे commitment कधीच देत नाही मग business नाही मिळाला तरीही हरकत नाही.
थोडक्यात बहुतांश लोकांनी अशा trainers आणि marketers कडून coaching घेतलेले असते किंवा service घेतलेली असते. दोन्ही मध्ये त्यांचे हात भाजलेले असतात. आणि झाला असतो भ्रमनिरास.
माझे असे बरेच व्यावसायिक विद्यार्थी मित्र आहेत ज्यांचे digital marketing बद्दल चे concepts आमच्या कडे आल्यावर १००% clear झालेत आणि त्यांच्या business ला व्यवस्थित दिशा मिळाली.
तुम्ही स्वतःला फार under value केले आहे, video courses सुरु करा आणि सगळ्यांना या बद्दल कळू द्या – असा सल्ला काही व्यावसायिक व विद्यार्थांनी केल्यावर मी हे portal launch केले.
abhaysonak.com वर तुम्हाला digital marketing चा सर्वांगीण (holistic) दृष्टिकोन देऊन पहिले तुमचे concepts clear करतो व नंतर स्टेप बाय स्टेप demonstrations देऊन methods शिकवतो. यामध्ये वेबसाईट चे महत्व, ग्राफिक्स designing, SEO, facebook marketing, sales funnel, list building सारखे सर्व विषय शिकवतो.