तुम्हाला तुमच्या जीवनाचे उद्दिष्ट माहिती आहे का? यशस्वी लोकांना ते माहिती असते.....

खरंच तुम्हाला तुमच्या जीवनाचे उद्दिष्ट माहिती आहे का? तुमच्या जीवनाचे ध्येय, purpose अथवा उद्दिष्ट्य काय आहे, हे आपण जाणता काय? व्याख्या वेग-वेगळ्या असल्या तरी ह्या सर्व शब्दांचा संदर्भ मात्र एकच आहे- तुम्हाला जीवनात काय साध्य करायचे आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ह्याबद्दल clarity नसली तरी यशस्वी लोकांना ह्याची कल्पना असते कि त्यांच्या आयुष्याचा उद्दिष्ट काय आहे. परंतु असे successful लोक फार थोडके म्हणजे केवळ ५% आहेत.

माणसाला एक साधं, सरळ, चौकटीत आखून दिलेला आयुष्य जगण्याची सवय लागलेली आहे. आई च्या कुशीत त्याची चाहूल लागण्यापासून ते जन्म घेण्यापर्यंत, समाजाने बांधून दिलेल्या नियमावली प्रमाणे लहानाचे मोठे होईपर्यंत आणि त्यानुसार आपले वागणे बोलणे, शिक्षण-व्यवसाय निवडण्यापासून ते धकाधकीच्या जीवनात आपले अस्तित्व विसरून तग धरून राहण्यासाठी आटापिटा करीत असेपर्यंत आणि हेच सगळे ओझे वाहता-वाहता एक दिवस अखेरचा श्वास घेऊन नेहमीसाठी विस्मरणात जाईपर्यंत आपण कधी तरी विचार केलाय का, की खरंच माझ्या जीवनाचे उद्दिष्ट काय आहे? किंबहुना कधीच नाही.

बहुतांश लोकांचा आयुष्य ह्याच चौकटी मध्ये व्यतीत होतो आणि तो तसाच जगला जाणे अपेक्षित आहे असं आपण मानतो. वर्षानुवर्षांपासून चालत असलेली एक परंपरागत जीवनशैली जगण्यास आपण समर्थ झालो की आपले जीवन सार्थकी लागले अशी आपली भावना झालेली आहे. पण ह्या दृष्टिकोनातुन आपण एक successful जीवन जगू शकत नाही. हीच एक गोष्ट यशस्वी माणसाला बाकी लोकांपासून वेगळा करते. जगात जे थोडे थोडके ५ टक्के यशस्वी लोक आहेत त्यांना माहित आहे कि त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट काय आहे, त्यांना आपल्या आयुष्यात काय achieve करायचे आहे आणि त्यांच्या जीवनाचा purpose काय आहे.

Facebook वर दररोज लाखो लोक त्यांचे जीवनातील अविस्मरणीय क्षण, आवडलेले विचार, फोटोज share करत असतात. तुमच्या भावना व्यक्त करण्याचे एक अत्यंत प्रभावी माध्यम म्हणून नावारूपाला आलेला हा platform ह्याच कारणामुळे इतका लोकप्रिय ठरला आहे. मी स्वतः दररोज अनेक माहिती, विचार Facebook वर प्रकट करत असतो. त्याच बरोबर लोकांनी share केलेले post आणि अत्यंत सुंदर माहिती फेसबुक च्या माध्यमातून रोज माझ्या पर्यंत पोहचत असते. असाच व. पु. काळे ह्यांनी लिहलेला एक वाक्य माझ्या वाचण्यात आला. तो असा कि -

" माणसाला खूप हवं असतं. पण नेमकं काय ते मात्र माहित नसतं. "जगायचंय जगायचंय" असं म्हणता म्हणता 'जगायचंय म्हणजे नक्की काय करायचंय' तेच माहित नसतं. "

अनेक लोकांनी हा पोस्ट share केला, त्याला अनेक likes देखील मिळाले आणि खूप लोकांनी त्यावर भरपूर चांगल्या comments सुद्धा केल्यात. पण मी ह्या वाक्याशी सहमत नाही. मी व. पु. काळेंच्या ह्या वाक्याशी disagree करतो. पण मग का शेकडो लोक ह्या वाक्याशी सहमत झालेत? कारण आपल्यापैकी बहुतांश लोक, जवळपास सर्वच लोक ह्याच पद्धतीने जीवन जगात असतात. त्यांना माहीतच नाही की त्यांना जीवनात नेमकं काय करायचं आहे. परंतु जगातले जे यशस्वी ५ टक्के लोक आहेत त्यांना माहित आहे की त्यांच्या जीवनाचा काय purpose आहे आणि जगायचंय म्हणजे नक्की काय करायचंय.

तर आज आपण जाणून घेऊयात कि जीवनाचा उद्दिष्ट जाणून घेणे हे कसे सहज शक्य आहे.

यशस्वी व्यक्तीची वैशिष्ट्ये

आपल्या जीवनाचे उद्दिष्ट जाणून घेऊन यशस्वी आयुष्याकडे वाटचाल करण्याअगोदर आपणास हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे की successful व्यक्तीची वैशिष्ट्ये काय आहेत. एक यशस्वी व्यक्ती खालील special traits आपल्या आयुष्यात आत्मसात करून असतो-

१. आपले passion follow करणे
यशस्वी व्यक्ती नेहमी त्यांची आवड जोपासतात. ते नेहमी ती गोष्ट अनुसरतात जी त्यांना मनापासून आवडते.
२. स्वतः समोर नेहमी challenge उभा करणे
यशस्वी व्यक्ती नेहमी स्वतःला challenge करीत असतात. ते नेहमी नव-नवीन skills आत्मसात करण्यासाठी स्वतःला प्रेरित करतात.
३. आनंदी, निरोगी, समृद्ध आणि अर्थपूर्ण आयुष्य जगणे
फक्त पैसे कमवाल्याने अथवा संपत्ती जमविल्याने तुम्ही यशस्वी होत नाहीत तर त्यासाठी तुमचे आयुष्य खऱ्या अर्थाने happy, healthy, wealthy, आणि मुख्यतः meaningful असणे फार महत्वाचे आहे.

लोकांचे तीन वर्गीकरण

जगात प्रत्येक व्यक्ती हा स्वतःला यशस्वी करू इच्छितो. प्रत्येकाची इच्छा असते कि त्याने प्रगती करावी, एक समृद्ध जीवन जगावे, जीवनात successful व्हावे. परंतु फार कमी लोक यशस्वी होतात. असे का बरं व्हावे? हा प्रश्न तुम्हाला देखील पडत असेल ना की सगळ्यांची इच्छा असून देखील फक्त काहीच लोकांना समृद्धीकडे वाटचाल करणे शक्य का होते?

ह्या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपण लोकांचे तीन प्रकारात वर्गीकरण केले आहे -

१. आपल्या सद्यपरिस्थितीत समाधानी लोक, ज्यांना growth मान्य नाही
२. ज्यांना growth मान्य असून देखील ते काही action घेत नाहीत अथवा action चे results मिळत नाहीत
३. यशस्वी / successful व्यक्ती

मी स्वतः ह्या तीनही वर्गीकरणातून माझा प्रवास केलेला आहे आणि सगळ्या गटांचा जवळून अनुभव घेतलेला आहे. माझ्या अनुभव आणि अभ्यासातून मी आपणास थोडक्यात ह्या वर्गीकरणाचे स्पष्टीकरण इथे देतो आहे.

१. सद्यपरिस्थितीत समाधानी लोक -

आपल्या current status मध्ये काही लोक समाधानी असतात आणि त्यांना growth मान्य नसते. गेल्या ५-१० वर्षांपासून ते तेच ते काम करीत असतात आणि येणारी पुढची ५-१० वर्षे देखील त्यांची तेच काम करत राहायची तयारी असते. नवीन skills शिकण्यात त्यांना रस नसतो.

मी स्वतः देखील वयाच्या १८ व्या वर्षापसून काम सुरु केले आणि जवळपास २६-२७ व्या वर्षापर्यंत म्हणजे जवळपास ८-१० वर्ष एकाच company मध्ये काम केला आहे. ह्यात तुम्ही एका मर्यादेपर्यंत समाधानी जीवन जगू शकता परंतु आनंदी जीवन नाही. तुम्हाला तुमच्या lifestyle मध्ये सतत तडजोड करावी लागते.

२. Growth मान्य आहे परंतु योग्य action न घेणे

८-१० वर्ष एक साचेबद्ध जीवन जगल्यावर वयाच्या २६व्या वर्षी मी रुळलेली नोकरी सोडून एका course ला प्रवेश घेतला आणि माझी नोकरी च काय तर field सुद्धा change केली. हे माझे प्रगती च्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल. पुढे ह्याच पद्धतीने १८-२० वर्ष म्हणजे वयाच्या जवळपास ४५ वर्षापर्यंत मी action घेत जगलो आणि माझी प्रगती देखील झाली. पण मी खऱ्या अर्थाने आनंदी झालो नाही. अर्थातच, घेतलेल्या actions आणि निर्णयांमुळे होत असलेल्या growth मुळे मी आनंदी होतो परंतु आज मी त्यापेक्षा कितीतरी अधिक आनंदी आणि समाधानी आहे ते फक्त मला माझ्या जीवनाचे उद्दीष्ट गवसल्यामुळेच !

ह्या वर्गातले लोक trial and error पद्धतीने त्यांच्या आयुष्यात बदल घडविण्याचा प्रयत्न करीत असतात. ते एक मध्यमवर्गीय, कमी आनंदी आणि संघर्षपूर्ण जीवन जगतात.

३.यशस्वी लोक, ज्यांच्या आयुष्यात purpose आहे

आता आपण वळूयात सगळ्यात महत्वाच्या category कडे-  यशस्वी लोक. यशस्वी लोक त्यांच्या जीवनाचा purpose अर्थातच उद्दिष्ट जाणून असतात आणि म्हणूनच ते happy, healthy, wealthy, आणि meaningful आयुष्य जगतात. आपल्या जगण्याचा उद्दिष्ट्य जाणून घेणे हे इथे अत्यावश्यक ठरते आणि आपण आपल्या जगण्याचा खरा उद्दिष्ट तेव्हाच जाणून घेऊ शकतो जेव्हा आपण स्वतःचा शोध घेतो. आपली स्वतःची स्वतःशी ओळख होणे हे अत्यंत महत्वपूर्ण आहे.

श्रीमदभगवदगीतेत सुद्धा नमूद आहे की माणसाने स्वतःच्या आयुष्याचा purpose जाणून घेण्यासाठी स्वतःचा शोध घेणे आवश्यक आहे. तुमच्या आयुष्याचा purpose जाणून घेतल्यावरच तुमची समृद्धीच्या मार्गाने वाटचाल सुरु होते. आणि हा purpose सुद्धा अश्या प्रकारे असला पाहिजे जेणेकरून जनमाणसाचं, सृष्टीचं कल्याण होईल. आपल्यासोबत समाजाची प्रगती, समृद्धी हे आपलं उत्तरदायित्व आहे. म्हणूनच जीवनाचा ध्येय आणि उद्दिष्ट निश्चित करताना ह्या उत्तरदायित्वाची सतत आठवण ठेवणे गरजेचे आहे.

आपला purpose ओळखा आणि अंगिकारा

प्रत्येक मनुष्य हा रंग-रूप, विचार, आचरण आणि गुणानुरुपे एकमेकापासून भिन्न आहे. प्रत्येकाच्या अंगी वेग-वेगळी गुण, skills आहेत. आज ह्या घडीला जगात ७ अब्ज लोक आहेत, कितीतरी अब्ज होऊन गेलीत आणि कितीतरी अब्ज येणार आहेत; परंतु प्रत्येक व्यक्तीची बोटांचे ठसे कधीच समान नसतात. म्हणूनच हाताच्या अंगठ्याचा ठसा हा त्याची unique identity म्हणून वापरला जातो. कारण प्रत्येकाचे अंगठ्याचे ठसे हे वेगळे असतात. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची वैशिष्ट्ये हि व्यक्तिनुरूप बदलत जातात. जेव्हा तुम्ही स्वतःचा शोध घेता तेव्हा तुम्हाला तुमची स्वतःची अस्तित्व मिळवून देणारी विशेष गुण, skills लक्षात येणार. ती गुण ओळखायला शिका. देवाने प्रत्येका मध्ये एक वेगळा skill set , वेगळा passion दिलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण काम करणे अपेक्षित आहे.

आपल्या गुणांचा शोध घेऊन, आपल्याला जे काम आवडतं, जो आपला passion आहे त्या कामाला घेऊन आपण काय साध्य करू शकतो तो purpose identify केला पाहिजे.आपल्या जीवनाचा उद्दिष्ट अर्थातच purpose ओळखला की successful लोक तो passion follow करतात आणि ध्येय ठरवतात. कारण यश म्हणजे ध्येयाला ठरवून त्या दिशेने आगेकूच करणे होय. ध्येय (target) ठरला की यशस्वी लोक passion learning attitude focus consistency आणि smart work ने त्यासाठी प्रयत्न करतात व आपल्या goal साध्य करतात.

Passion - आपल्या विशेष skill set आणि आवडीनुसार आपले ध्येय निश्चित झाले की passionately त्या एकाच गोष्टीचा ध्यास घेऊन त्यासाठी झोकून देणे हि यशस्वी लोकांची ओळख आहे. तुम्हाला तुमची आवड लक्षात आली की तुम्ही आनंदी मनाने ते काम न थकता, दररोज तेवढ्याच उमेदीनं करू शकता.

Learning attitude - यशस्वी लोक हे कधीच हार मनात नाहीत. कितीही चुका झाल्या तरी ते आपली जिद्द आणि चिकाटी सोडत नाहीत. चुकांमधून शिकत जाणे आणि अपयशाने खचून न जाता पुन्हा प्रयत्न करणे हि त्यांची वैशिष्ट्ये आहेत.एकाच चुकीची पुनरावृत्ती ते टाळतात.

Focus - ध्येयाच्या दिशेने सतत प्रयत्नशील असणे आणि आपल्या ध्येया व्यतिरिक्त अन्य कुठल्याही कामात वेळ वाया न घालवणे हि यशस्वी व्यक्तींची लक्षणे आहेत. अर्जुनाच्या अभेद्य लक्षासारखा त्यांच्या दृष्टीक्षेपात फक्त पक्ष्याचा डोळा असतो आणि ह्याच focus च्या भरवश्यावर ते आपला target सहज achieve करतात.

Consistency - यशस्वी लोक त्यांचे प्रयत्न कधीच सोडत नाहीत, थांबणे हे त्यांच्या शब्दकोशात नसते. अविरत पणे आपले प्रयत्न सुरु ठेवतात आणि चिकाटीने अडचणींवर मात करतात.

Smart work - SMART - Specific Manageable Achievable Realistic Time bound यशस्वी व्यक्ती पायऱ्या पायऱ्यांनी, योग्य नियोजनाद्वारे, पद्धतशीरपणे आपले ध्येय पूर्ण करते.

अश्याप्रकारे तिसऱ्या वर्गातील लोक अथार्तच यशस्वी लोक हे खऱ्या अर्थाने त्यांचे जीवन आनंदाने जगतात. आपली आवड जोपासत, आपले ध्येय आणि स्वप्न पूर्ण करत, एक स्वच्छंदी आयुष्य जगत असल्याने ते एक निरोगी जीवनशैली आत्मसात करू शकतात. जगण्याचा पुरेपूर आनंद घेत असल्याने त्यांचे आरोग्य देखील उत्तम राहते. उत्तम आरोग्यासोबतच संपत्ती, समृद्धीची जोड लाभते. दिशावर्धक आणि अर्थपूर्ण आयुष्य हे लोक जगत असतात. गेली कित्येक वर्ष मी स्वतः हे सगळे अनुभव घेतोय आणि स्वतःला त्या ५% यशस्वी व्यक्तींमध्ये बघतोय. आयुष्याच्या सुरवातीच्या ४५ वर्षांमध्ये मी घेऊ शकलो नसलेला पुरेपूर आनंद मी आज लुटतोय ते फक्त ह्या एका बदलामुळे, कारण- मला माझ्या जगण्याचे उद्दिष्ट कळले आहे आणि ते मी आत्मसात देखील केले आहे.

तर तात्पर्य असे कि यशस्वी लोकांना जे पाहिजे असतं ते त्यांना माहित असतं. कसं जगायचं ह्याच पुरेपूर ज्ञान त्यांना असतो. त्यांच्या जगण्याची खरी दिशा आणि अर्थ त्यांना गवसलेला असतो आणि म्हणूनच ते जीवनात यशस्वी होतात.

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Jeevan Samruddhi Mahamarg 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy