मोबाईल अ‍ॅप कि वेबसाइट – हा प्रश्न गोंधळात टाकतो का? जाणून घ्या दोघातला फरक!

मोबाईल अ‍ॅप आणि वेबसाइट हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. रोज आपण कित्येक मोबाईल अ‍ॅप वापरतो आणि वेबसाईट सर्फ करतो. पण या दोघातला फरक फार कमी युझर्स ला माहिती आहे.

वास्तविक पाहता दोन्ही प्लॅटफॉर्म वर सारखीच माहिती मिळते. तरीही आपण वेबसाईट च्या ऐवजी बरेच वेळा मोबाईल अ‍ॅप वापरतो. उदा: amazon.com …. या वेबसाईट वर आपण सहज खरेदी करु शकतो तरीही आपण ऍमेझॉन ची मोबाईल अ‍ॅप वापरूनच खरेदी करतो… असे का?… आपण अ‍ॅप का वापरतो… ?

 मुळतः मोबाईल अ‍ॅप व वेबसाइट या दोघां मध्ये एक मोठा फरक आहे. वेबसाईट चा कोड   हा वेब सर्व्हर वर असतो तर मोबाईल अ‍ॅप चा कोड हा युझर च्या मोबाईल मध्ये असतो.   युझर जेंव्हा वेबसाईट सर्फ करतात तेंव्हा वेबसाईट चा कोड हा सुद्धा युझर ला लागणाऱ्या   डेटा सोबत वेब सर्व्हर पासून युझर च्या डिव्हाईस पर्यंत इंटरनेट बॅण्डविड्थ च्या   माध्यमातून  पोहचतो. मोबाईल अ‍ॅप मध्ये मात्र केवळ फक्त डेटा च ट्रॅव्हल करतो कारण   मोबाईल अ‍ॅप चा कोड हा युझर च्या मोबाईल मध्येच असतो (कारणं युझर ने मोबाईल अ‍ॅप   अगोदरच डाउनलोड करून ठेवलेली असते).

वरील एका कारणा मुळे मोबाईल अ‍ॅप हि वेबसाईट पेक्षा जास्त वेगात तुम्हाला रिझल्ट्स देते व म्हणूनच प्रभावी ठरते .

मोबाईल अ‍ॅप का तयार करावी ?

१. प्रभावी – वर सांगितल्या प्रमाणे मोबाईल अ‍ॅप हि वेबसाईट पेक्षा वेगात काम करत असल्या मुळे प्रभावी ठरते.
२. नोटिफिकेशन्स – युझर पर्यंत नोटिफिकेशन्स द्वारे आपण सातत्याने पोहचू शकतो. मार्केटिंग साठी हे एक प्रभावी माध्यम ठरते.
३. दिखता है तो बिकता है – मोबाईल अ‍ॅप चा शॉर्ट-कट (किंवा आयकन) हा मोबाईल च्या स्क्रिन (ड्रॉवर) वर दिसत असल्या कारणाने युझर ला त्याची आठवण होत असते व पर्यायाने त्या अ‍ॅप चा वापर होऊ शकतो.

मोबाईल अ‍ॅप वेबसाईट च्या तुलनेत प्रतिकूल कशी ठरू शकते…

१. एखादा युझर ज्याला कोडिंग चे ज्ञान नाही वेबसाईट तयार करू शकतो पण मोबाईल अ‍ॅप साठी मात्र तुम्हाला डेव्हलोपर कडेच जावे लागेल, पर्यायाने आपण dependency तयार करत असतो.

२. युझर च्या मोबाईल मध्ये अ‍ॅप डाउनलोड करणे हे फार जिकरीचे काम आहे. यासाठी कंपन्या मोठ्या स्ट्रॅटेजीस तयार कराव्या लागतात व नंतर ते मार्केटिंग साठी मोठा खर्च करून त्या स्ट्रॅटेजीस अमलात आणतात.

३. मोबाईल अ‍ॅप डाउनलोड केल्या नंतर ते युझर कडून वापरल्या जाणे तेवढेच गरजेचे आहे. या एका कारणा साठी नव-नवीन ऑफर्स किंवा स्कीम्स सातत्याने देत राहणे गरजेचे असते.

४. वापरात नसलेली अ‍ॅप युझर अन-इन्स्टॉल करतात आणि इथे कंपन्यांचे फार मोठे नुकसान होते. मार्केटिंग साठी वापरलेले बजेट वाया जाण्याची जोखीम असते.

५. सेफ्टी – वास्तविक पाहता या मुद्यावर बरेच अर्ग्युमेण्ट करता येतील पण माझ्या मते – युझर्स करता मोबाईल अ‍ॅप पेक्षा वेबसाईट वापरणे हे कधी हि जास्त सुरक्षित आहे. अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करू शकता.

सुरक्षित वेबसाईट्स सर्फिंग साठी तुम्ही तुमचा वेब ब्राउसर hardened करू शकता…

मोबाईल अ‍ॅप तुमच्या मोबाईल मधील डेटा access करू शकतात पर्यायाने त्या असुरक्षित असू शकतात…
मोबाईल अ‍ॅप डाउनलोड केल्याने तुम्हाला त्या अ‍ॅप संबंधित नोटिफिकेशन येत राहतात. मात्र हे नोटिफिकेशन्स बऱ्याच वेळा डोकेदुखी ठरतात. अँड्रॉइड मध्ये जाऊन आपण नोटीकेशन बंद करू शकतो पण फार कमी युझर्स हे ऑप्शन वापरतात व नोटिफिकेशन्स द्वारे त्यांची डोकेदुखी हि सुरूच राहते.

काही मोबाईल अ‍ॅप हे फक्त सॉफ्टवेअर चेच काम करतात म्हणून त्यांची तुलना वेबसाईट शी करता येणार नाही. उदा: मॉर्निंग वॉल्क ला जातांना आपण किती पावले चाललो हे एक मोबाईल अ‍ॅप च मोजू शकते… या साठी वेबसाईट ची गरज नाही, किंबहुना अशी वेबसाईट तुम्हाला मिळणार नाही.

{{Abhay Sonak}}
A Digital Marketing Coach.

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Jeevan Samruddhi Mahamarg 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy